झरेकाठी प्रतिनिधी: सोमनाथ डोळे
बॉलिवूडची प्रसिद्ध सिने अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी आज शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.सकाळच्या सत्रात त्या शिर्डीत दाखल झाल्या. साईबाबा संस्थानच्या द्वारावतीतून त्यांनी समाधी मंदिरात प्रवेश केला. समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी काही वेळ साईंच्या समोर नतमस्तक होऊन प्रार्थना केली. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित भाविकांनी त्यांना पाहताच उत्सुकता व्यक्त केली, मात्र संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे दर्शन अतिशय शांततेत पार पडले.दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानवतीने प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केला.

संस्थानतर्फे त्यांना साईंची प्रतिमा, शाल आणि प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी संस्थानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व भाविक सुविधा उपक्रमांची माहिती घेतली. भूमी पेडणेकर सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. कामाच्या धावपळीतून वेळ काढत तिने साई दर्शनासाठी शिर्डीला भेट दिली.

दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने सांगितले की, शिर्डीत आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. साईबाबांवर आपली खूप श्रद्धा असून दरवर्षी इथे येण्याचा प्रयत्न करते, असेही ती म्हणाली.यावेळी साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके. दिपक लोखंडे , मंदिर विभागाचे कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.फोटो कॅप्शनसाठी> श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर सिने अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी सत्कार केला.





