स्तंभलेख: सहदेव जाधव
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा २९ ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे. डॉक्टरांचे पथक वैद्यकीय तपासणीसाठी उपोषणस्थळी दाखल झाले होते, मात्र जरांगे यांनी तपासणी करण्यास नेहमी प्रमाणे नकार दिला आहे. त्यांना उलट्याचा त्रास होत असून, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी देखील कमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर असून, मध्यरात्री हालचालींना वेग आला आहे. म्हणजेच सरकारची धावपळ सुरु झाली आहे. म्हणजेच सरकार आता पुन्हा एकदा सर्व कामे बाजूला ठेऊन जरांगे यांचा नामजप सुरु करेल व जरांगे देखील सरकारला झुकवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करेल. असो मराठा समाजाला नक्कीच आरक्षण दिले पाहिजे. पण जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे काम मनोज जरांगे यांनी थांबवले पाहिजे.

सरकारला वेळ देऊनही कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याच्या नाराजीमुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली आहे असे बोलले जाते. जरांगे यांनी नेहमी प्रमाणे शिव्याची राखरांगोळी वाहत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींना शिवराळ भाषा वापरणे हे या उपोषणा मागचा मुख्य उद्देश समजावा का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. विनाकारण एखादया व्यक्तीला त्याच्या शरीर रचनेवरून हिणवायचे ही सर्रास पद्धत या जरांगे नी सुरु केली आहे. आता महाराष्ट्रात असा पायंडा पडणार असेल तर राज्याचे भविष्य अवघड आहे. मनोज जरांगे यांची भाषाशैली अतिशय घाणेरड्या प्रकारची असल्याने त्यांचे मीडिया वरील संभाषण ऐकून लहान मुलांच्या संस्कारावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. बालमनाचा विचार करून किमान यांना भाषशैली सुधारण्याची समज सरकारने देणे अपेक्षित आहे. परंतू त्यांच्या शिव्या म्हणजे फुले फेकून मारल्यासारखे हे सरकार सहन करत आहे.

दरम्यान, जरांगे काही मंत्र्यांना सरसकट खालच्या स्तरावर करत असलेल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त करत आहेत. यात विशेषकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मराठा आरक्षण समिती चे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जरांगे यांनी दिलेल्या शिव्या या अतिशय अश्लाघ्य भाषा ही महाराष्टच्या संस्कृतीला अशोभानीय आहे. जरांगे यांनी समाजाच्या जोरावर सरकारला व काही लोकांना टार्गेट करून धमकवणे बंद केले पाहिजे. महाराष्ट्राच्या संस्कृती चा विचार केला पाहिजे. विशेष म्हणजे उपोषणस्थळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवला आहे. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जरांगे ज्या भाषेचा वापर करतोय हे अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते. बारा बलुतेदार आठरा पगड जाती यांना सोबत घेऊन चालणारा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि आपण त्यांना साक्षीला घेऊन असा भाषेचा वापर करणार असेल तर हे महाराष्ट्राची मान खाली घालणारा प्रकार जरांगे आपण करत आहात.
अभिजीत दीपके यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाला उघडपणे पाठिंबा दर्शवला असून, जंतर मंतरपेक्षाही मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.याचा अर्थ यांना फक्त आरक्षणाऐवजी आंदोलनांची शर्यत लावायची आहे. मनोज जरांगे यांनी कायदा सुव्यवस्थेलाच चॅलेंज केल्याने भविष्यात जाती जातीत तेढ निर्माण होण्याचा धोका संभावत आहे. आरक्षण समितीवर देखील जरांगे यामाध्यमातून दबाव टाकत असल्याचे लक्षात येत आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलन नक्की करावे, आरक्षण ही माघावं, जमले तर कुणबी चं नाहीतर त्यापुढील आरक्षण असेल ते घ्यावं पण शिवराळ भाषा वापरून स्वतःचे अन्न खाण्यासाठी असलेले तोंडातून गटार वाहू देऊ नये अशी अपेक्षा
विशेषतः, जरांगे पाटील सरसकट खालच्या स्तरावर करत असलेल्या वक्तव्यांमुळे राज्यभरातून नाराजी पसरली आहे. कालपर्यंत जरांगे यांना मानणारा वर्ग कमी झाला आहे. जरांगे यांच्या तोंडातून वाहणारी “शिव्यांची गटार” थांबवणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने कडक आणि ठोस पाऊले उचलावीत







