राजसत्ता न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता समाजाला दिशा देण्याचे आणि सत्य जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. याच जबाबदारीची जाणीव ठेवून ‘राजसत्ता न्यूज’ हे वृत्तवाहिनीचे माध्यम जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत अनेक चालू घडामोडींची विश्वासार्ह माहिती पोहोचवत आपला वेगळा ठसा निर्माण करत आहे. प्रत्येक घटनेत निडर राहून राजसत्ता न्यूज वृत्त प्रकाशित करत असते. अनेक घटकांना आपल्या वृत्तांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी या वृत्तांमधून सत्यता निर्भीडता निष्पक्ष पणे मांडली आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी राजसत्ता न्यूज हे हक्काचे व्यासपीठ बनले आहे.
सत्य, निर्भीडता, निष्पक्षता आणि जनहित या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून ‘राजसत्ता न्यूज’ने अल्पावधीतच वाचक आणि प्रेक्षकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंतच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ देण्याचे काम या माध्यमातून सातत्याने केले जात आहे.
वर्धापन दिन हा केवळ एका वर्षाचा टप्पा नसून, आजवरच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा आणि भविष्यातील वाटचालीची नवी दिशा निश्चित करण्याचा दिवस आहे. येणाऱ्या काळात ‘राजसत्ता न्यूज’ने अधिक व्यापक स्वरूपात जनतेचा आवाज बनावे, सत्य आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेची परंपरा अधिक बळकट करावी, हाच भविष्यात आमचा मानस आहे. राजसत्ता न्यूजने अवैध धंद्याविरोधात आवाज उठवला होता. याचेच द्योतक म्हणून संगमनेर तालुक्यात अवैध धंद्याना आळा बसला आहे. शासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर अंकुश ठेवण्याचे काम केले. मागील पाच वर्षात राजसत्ता न्यूज ने प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर अंकुश ठेवण्याचे काम केले आहे.
अवैध धंदेवाल्यांकडून कायम जीवे मारण्याच्या धमक्या
राजसत्ता न्यूज च्या माध्यमातून अनेकदा वाळू तस्कर, गांजा तस्कर, गुटखा तस्कर, गौण खनिज ( खडी क्रेशर, मुरूम) मटका जुगार याविरोधात निर्भीडपणे वृत्तांकन केले. अनेक तस्करांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अनेकांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गावठी कट्टे घेऊन घरात घुसून धमकवण्याचा प्रयत्न केला. परंतू कुठल्याही धमकीला भीक न घालता निर्भीड वृत्तांकनाचा घेतलेला वसा सोडला नाही. आणि याच कारणाने आपल्या आशीर्वादाने राजसत्ता न्यूज पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे. आजपर्यंत एक कोटीच्या आसपास दर्शकांनी पसंदी दर्शवली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही आणखी जोमाने व निर्भीड पणे वृत्तांकन करू. राजूर ता. अकोले येथून जेष्ठ मार्गदर्शक प्रा. अजय पवार सर, निर्भीड पत्रकार सतिष फापाळे, नवनाथ वावरे, सोमनाथ डोळे, संदीप काळे, किरण पुरी, शौकत पठाण व युनूस शेख यांच्यासारखे सहकारी लाभले. यामुळे या क्षेत्रात काम करण्याची रुची वाढली.
भाजप चे जेष्ठ नेते तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब, माजी मंत्री तथा काँग्रेस चे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब, मा. खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील, खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. निलेश लंके साहेब, मा. ना. शालिनीताई विखे पाटील, आ. काशिनाथ दाते सर, आ. संग्राम जगताप, मा.आ. बबनराव पाचपुते, माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आ. अमोल खताळ, आ. सत्यजित तांबे, आ. किरण लहामटे, आ. विठ्ठलराव लंघे पाटील, आ. विवेक कोल्हे, आ.अक्षय कर्डीले, मा. आ. वैभव पिचड, मा. आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या सह राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, शासकीय निमशासकीय अधिकारी यांनी राजसत्ता न्यूजला कायम प्रोत्साहन दिले. त्याबद्दल त्यांचेही मनस्वी आभार.

राजसत्ता न्यूज च्या माध्यमातून अनेक नवखे पत्रकारांना मुक्त पत्रकारिता करण्याचे व्यासपीठ मिळाले. माझ्या ‘राजसत्ता न्यूज’च्या संपूर्ण टीमला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.! तसेच माझे चॅनल चे हितचिंतक, दर्शक यांना मनापासून शुभेच्छा.!
तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने माझ्या लेखणीला अधिक बळ मिळो, माझ्या कार्याला नवी उंची मिळो आणि समाजहिताची ही वाटचाल अशीच अविरत सुरू राहो..! हा आशीर्वाद दर्शकांकडून मिळवा हीच अपेक्षा.!
आभारी : सहदेव जाधव, ( संपादक तथा निवेदक)






