झरेकाठी प्रतिनिधी : न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मातोश्री कै. बबाबाई मारुती घुगे यांच्या स्मरणार्थ दिवाळीनिमित्त दिव्यांग बांधवांना फराळ वाटप तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘समाजरत्न’ आणि पत्रकारांना ‘पत्रकार भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्वामी विवेकानंद नगर, सिडको येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्यास श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष विद्यावाचस्पती डॉ. तुळशीराम महाराज घुगे, मोहन रंगनाथ घुगे, वंजारी सेवा संघाचे गुजरात अध्यक्ष तथा उद्योगपती, आमदार सीमा हिरे, गोकुळ गिते, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हरीभाऊ कारभारी गिते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश गिते, ज्येष्ठ उद्योगपती बुधाजी पानसरे, ज्येष्ठ समाजसेविका विमलताई आव्हाड, मुंबई भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिंदमे, नगरसेविका छायाताई दिलीप देवांग, ज्येष्ठ समाजसेवक अमित नहार, कृषी अधिकारी रणजित आंधळे आणि समाजसेवक देवा वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

समाजरत्न पुरस्काराने मान्यवरांचा गौरवसामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, प्रशासकीय, उद्योग, अध्यात्मिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये सौ. दीपालीताई गणेश गिते (नगरसेविका, मनपा नाशिक), बाबुराव कारभारी घुगे (बँकिंग क्षेत्र तथा वित्तीय सल्लागार), प्रियंकाताई दुंदे (नगरसेविका तथा समाजसेविका), अनिल कहाले (सामाजिक कार्यकर्ते, नागपूर), डॉ. चेतनाताई सेवक (अध्यक्षा, राधिका फाउंडेशन), प्रणितीताई पाटील (अध्यक्षा, जनबांधिलकी संस्था), शरद कचरू घुगे (पोलीस, नवी मुंबई), लताताई दिनकर पाटील (माजी नगरसेविका, मनपा नाशिक), ओमप्रकाश जोशी (अध्यात्मिक क्षेत्र, सुरत), डॉ. निरंजन नंदन (वैद्यकीय सेवा, सिडको), शैलेश जावळे (युवा उद्योजक, नाशिक), शोभन प्रकाश सोनवणे (समाजसेविका, आश्वी, ता. संगमनेर), खंडू कोटकर (दिव्यांग रत्न, निफाड), डॉ. सिद्धेश देशमुख (एम.डी. मेडिसिन), बाळासाहेब मल्हारी बोडके (सेवानिवृत्त कक्ष अधिकारी), भरत रामभाऊ कानकाटे (बांधकाम व्यावसायिक), नितीन नेर (उपायुक्त, समाजकल्याण विभाग, मनपा नाशिक), सचिन काजळे (समाजसेवक, नाशिक), विलाबाई देविदास पगारे (समाजसेविका, सिडको) आणि गजानन रनबावळे (समाजसेवक, नाशिक) यांचा समावेश आहे.

पत्रकार भूषण पुरस्काराने पत्रकारांचा सन्मान
पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दैनिक सार्वमत, दैनिक नायक आणि दैनिक प्रभातचे पत्रकार सोमनाथ डोळे (संगमनेर), किरण लोखंडे (मुख्य संपादक, दैनिक पुण्यनगरी), चंदन अभिमान खरे (संपादक, रणभूमी), जयवंतराव महाजन (मुख्य संपादक, दैनिक महासागर), नितीन चव्हाण (संपादक, दैनिक पंचनामा) आणि संतोष विश्वास लचके (संपादक, लोकशाही न्यूज) यांना पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी भोजराज गिते (सुरत), डॉ. उल्हास कुटे, कांती केदारे सर, सुनील दगडू आप्पा घुगे, रोहिदास आव्हाड आणि मारुती इलग यांचे सहकार्य लाभत आहे.
कार्यक्रमाला दिव्यांग बांधव, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा यमुना बाळासाहेब घुगे आणि बी. के. नागरे यांनी केले आहे.






