संपादकीय:सहदेव जाधव
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या माजी सभापती स्व. मीराताई चकोर यांचे अल्पशा आजाराने निधन माजी महसूल मंत्री जेष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या त्या खंद्या समर्थक
स्व.मीराताई चकोर यांचे दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:१७ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन. सदर बातमी वाऱ्यासारखी संगमनेर तालुक्यात पसरली. राजकीय क्षेत्रातील प्रतिभाशाली नेतृत्व हरपल्याने राजकीय क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मीराताई चकोर यांनी आपल्या राजकीय व सामाजिक कारकीर्दीत अहिल्यानगर जिल्हा परिषदेत समाजकल्याण समितीच्या सभापती म्हणून उल्लेखनीय काम केले होते.

सामाजिक कार्याची जाण, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांमुळे त्यांनी सार्वजनिक जीवनात आपला एक वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या जाण्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
गुरुवार दिं.१७ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ७:१७ वा.) अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी शुक्रवार १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता पिंपळे तालुका संगमनेर येथे पार पडला. यावेळी संपूर्ण तालुक्यातून सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांचे पती इंजिनिअर बी. आर. चकोर, हे देखील सामाजिक कार्यात अग्रेसर होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली चकोर दांपत्य हे राजकीय व सामाजिक जीवनात काम करत होते.

बाळासाहेब थोरात यांच्या कार्याचा व विचारांचा पकडा या दांपत्यावर होता. त्यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सभापती म्हणून धुरा सांभाळली होती. या पदावर असताना त्यांनी जिल्ह्यातील वंचित, दलित आणि मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना प्रभावीपणे राबवल्या. संगमनेर तालुक्यात पक्षीय संघटन देखील योग्य रीतीने केले. संगमनेर तालुक्यातील पिंपळे हे त्यांचे मूळ गाव असल्याने, त्यांनी या भागात ग्रामीण पातळीवर काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यात आणि महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करण्यात मोलाचे योगदान दिले.

लोकाभिमुख नेतृत्व म्हणून संपूर्ण तालुका त्यांना ओळखत होता. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून त्यांनी वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवल्या. एक अभ्यासू आणि संवेदनशील महिला नेत्या म्हणून जिल्हा परिषदेत त्यांनी ठसा उमटवला होता. माजी सभापती स्व.मीराताई चकोर यांनी प्रामुख्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर हा भाग काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला मानला जातो. मीराताई चकोर या संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावच्या रहिवासी असल्याने त्यांनी याच राजकीय विचारसरणीतून आणि नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत आपले कार्य केले. त्यांच्या निधनानंतर नामदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या स्थानिक सहकाऱ्यांनी मीराताई चकोर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
स्व.मीराताई चकोर यांच्या पश्चात त्यांचा मोठा आणि सुशिक्षित परिवार आहे. पती इंजिनिअर बी. आर. चकोर, मुलगा: अक्षय चकोर, मुलगी ऋतुजा चकोर(खताळ), असा परिवार आहे.. संपूर्ण संगमनेर तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले जात आहे. राजसत्ता न्यूज परिवाराच्या वतीने देखील त्यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकत शब्द सुमनांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात
शब्दरचना: सहदेव भि. जाधव B.A.D.L.L&L.W & Master of Arts in Mass Communication तथा संपादक : राजसत्ता न्यूज मीडिया ग्रुप






