शब्दरचना : सहदेव जाधव
संगमनेर अकोले तालुक्यातील पठार भागात गेल्या मागील दशकात पत्रकारिता क्षेत्रात नावा रुपाला आलेला एक हुशार, चाणक्ष्य, निर्भीड पत्रकार म्हणजे सतिष फापाळे. सतिष फापाळे यांच्या पत्रकारितेत कायम शोध पत्रकारिता दडलेली आहे. आज या तरुण पत्रकाराचा वाढदिवस. त्याबद्दल आपण त्यांच्या पत्रकारिता विश्वावर प्रकाश टाकूया. अन्यायाविरोधात कायम षंड ठोकून खंबीर उभा राहतांना सतिष ला आम्ही कायम बघितले आहे. 20 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस आहे. प्रथमता सतिष ला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!

सतिष फापाळे हा युवा पत्रकार निर्भीड आणि गुन्हेगारी क्षेत्रातील बातम्याचा महानायक. सतिषने आपल्या बातम्याच्या माध्यमातून कायम अन्यायविरोधात खंबीर उभा राहून अनेकांना न्याय देण्याचे काम केले आहे. अवैध धंद्याना आपल्या लेखणीच्या माध्यमातून अंकुश ठेवण्याचे काम सतिषने केले आहे. त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांमध्ये एक दहशत निर्माण केली आहे. सध्याच्या काळात अनेक पत्रकार पत्रकारितेकडे व्यवसाय म्हणून बघत असतात. आपल्या माध्यमांना जाहिरात मिळते म्हणून अनेकदा अन्यायाकडे कानाडोळा करून काही पत्रकार आपल्या नीती मूल्यांशी सौदा केल्याचे अनेक उदाहरणे दिसत आहेत. पत्रकारितेचा गंधही नसलेले पत्रकार उदयास आले आणि त्यांनी पत्रकारितेची नीतिमत्ता पायंदळी तुडवली.
लोकशाही राज्यात पत्रकारिता ही खूप महत्त्वाचा भाग असते पत्रकारिता विकली गेली तर लोकशाही संकटात येते. परंतु सध्या पत्रकारिता काहींनी आपले माध्यमांना मिळणाऱ्या जाहिराती व वाम मार्गाने आलेल्या अर्थपूर्ण संबंधाने पत्रकारिता बदनाम केली आहे. काहींनी मात्र पत्रकारिता करताना पीडित वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. पत्रकार सतिष फापाळे हे एक यातील एक पत्रकार..!

सतीश फापाळे आपल्या पत्रकारितेतून आपली भूमिका मांडताना निर्भीडपणे मांडलेली आहे. अवैध धंदे, राजकीय क्षेत्रातील बातम्या, भ्रष्ट कारभारावर तीव्र प्रहार हे त्यांच्या बातमीतील मुख्य आशय. कुणालाही न डगमगता निर्भीडपणे वृत्तांकन करणे ही त्यांच्या बातमीची ओळख त्यांनी त्यांच्या संपूर्ण पत्रकारितेच्या कार्यकाळात वाळू तस्करी,गांजा तस्करी, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी आपल्या बातमीतून वृत्त प्रकाशित करत आवाज उठवला आहे. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, शासकीय कार्यालय यांच्या भ्रष्ट कारभारावर आवाज उठवला आहे, पीडित आणि वंचित या घटकांना न्याय देण्याचं काम सतीश फापाळे यांनी केला आहे. म्हणूनच त्यांचा पत्रकारिता या क्षेत्रात विशेष दबदबा आहे.

मध्यंतरी अकोले तालुका आणि संगमनेर तालुक्यात बाल मातांचे प्रमाण वाढले होते यावर त्यांनी प्रशासनाला थेट आपल्या बातमीतून जाब विचारला होता. बालविवाह संदर्भात बालविवाह समितीलाच आपल्या बातमीच्या माध्यमातून घेरले होते. हा विषय पठार भागात अतिशय चर्चेला गेला. बालविवाह संदर्भात त्यांनी आपली भूमिका थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालत गुन्ह्याची तीव्रता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला दाखवून दिली. पुणे नाशिक रेल्वे साठी आंदोलनात थेट सहभाग घेऊन शासनाला थेट जाब विचारणारा एकमेव पत्रकार सतिष फापाळे हेच होते.
पुणे नाशिक रेल्वे साठी विविध संघटनेच्या आंदोलनात व बैठकांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. यासाठी आंदोलकांसोबत थेट मुंबई दिल्ली येथील मंत्रालयात जाऊन शासनाला खडे बोल सुनावले. पुणे नाशिक रेल्वे या भागातील लोकांना किती महत्वाची आहे, याचे अभ्यासपूर्ण मांडणी केली गेली यात सतिष फापाळे आघाडीवर होते. त्यांचे हे योगदान कायम पिढ्यानंपिढ्या आठवणींत राहील.
आज अशा निर्भीड व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मित्र म्हणून कायम माझ्या पाठीशी भक्कम उभा राहणाऱ्या माझ्या या मित्रासाठी ह्या चार ओळी आठवतात.
“आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणाऱ्या आणि प्रत्येक संकटात खंबीरपणे पाठीशी राहणाऱ्या माझ्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.! देव तुला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देवो.” सहदेव जाधव (B. A. D. L. L & L.W / M. A. Mass Communication & Journalism)






