संपादकीय: सहदेव भि. जाधव/जरांगेचा जातीद्वेष
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर वडेट्टीवर यांनी केले आरोप: चक्क 1400 कोटीची कंत्राटे दोन (डिफेन्डर) आलिशान कार तर दोन लाखांचा आयफोन मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आपल्या निकटवर्तीयांमुळे अडचणीत आले आहेत. कधीकाळी मनोज जरांगे यांचे समर्थक असलेले तथा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग असलेले काही मराठा कार्यकर्ते आता मनोज जरांगे यांच्यावर टीकेची झोड उठवत आहे. मनोज तरंगे यांनी शासनासोबत आंदोलन मागे घेण्यासाठी काही सेटलमेंट केल्याचे आरोप त्यांचेच कार्यकर्ते करत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील मनोज जरांगे यांच्यावर चौदाशे कोटी रुपयांच्या कंत्राटाचा आरोप केला आहे. संबंधित पुरावे माझ्याजवळ असल्याचे उद्गार देखील यावेळी त्यांनी काढले आहेत. मागील तीन वर्षापासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मागील तीन वर्षांपासून मनोज जरांगे यांनी आडमुठी भूमिका घेऊन शासनाला वेठीस धरले आहे. मनोज जरांगे यांची असलेली शिवराळ भाषा यामुळे त्यांच्या वर अनेक लोक तथा काही पक्षांचे नेते नाराज आहेत. ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ, प्राध्यापक लक्ष्मण हाके, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, गुलाबराव पाटील यांना व्यक्तिशः शिवराळ भाषा वापरत थेट या नेत्यांची लायकी काढली होती, ज्येष्ठ नेत्यांना अशा पद्धतीने शिवराय भाषा वापरणे काही मराठा आंदोलकांना रुचले नाही, म्हणून काही मराठा आरक्षण कार्यकर्ते थेट मनोज जरांगे पासून दुरावले गेले, व त्यांनी मनोज जरांगे यांची कृती ही संशयास्पद असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली. कधीकाळी मनोज जरांगे यांच्यासोबत असलेले अनेकदा व्यासपीठावर त्यांच्या बाजूला दिसलेले कार्यकर्ते थेट मनोज जरांगे यांच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत.

मनोज जरागे यांनी यावेळी केलेले आंदोलन थेट विसाव्या दिवशी अचानक माघारी घेतल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. सरकार आपल्या उपोषणाला दाद देत नाही असे दिसताच जरांगे यांनी थेट मुंबईची वाट धरली होती व मुंबई जाम करायची शासनाला झुकवायचे अशी महत्त्वकांक्षा ठेवून मग जरांगे हे अंतरवाली ते मुंबईकडे निघाले होते. परंतु बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मनोज जरांगे यांचा ताफा थांबला आणि येथेच अनेक घडामोडी घडल्या. जरांगे यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आणि मराठा आंदोलकांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी जरांगे यांनी सरकारला तीन महिन्यांचा अल्टिमेटम देत माघार घेतली. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्यावर राजकीय आणि आर्थिक आरोप होत आहेत. यावेळी मनोज जरांगे यांचे काही कालचे कार्यकर्तेत मनोज जरांगे यांनी मोठी सेटलमेंट केली असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील मनोज जरांगे यांनी आंदोलन आपल्या सहकार्याला कंत्राट मिळण्यासाठी केले होते असा खळबळ जनक आरोप केला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. यादरम्यानचे काही पुरावे माझ्याकडे असल्याचा दावा देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मनोज जरांगे यांच्यावर दोन डिफेंडर कार कुठून आल्या? डिफेंडर गाड्या देणारे ते भोसले कोण असा प्रश्न देखील त्यांचेच सहकाऱ्यांकडून विचारला जात आहे. अजय बारस्कर हे मनोज जरांगे यांचे सहकारी होते आज त्यांनीच हा प्रश्न उपस्थित केल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. तर मंत्री संजय शिरसाट यांना टार्गेट करण्यासाठी माजी आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून मनोज जरांगे यांनी सहा कोटी रुपये घेतले असल्याचा गौप्यस्फोट अमोल खुणे यांनी केला आहे.

जरांगे यांना डिफेंडर देणारे भोसले कोण आहेत ते बघूयात.
सुभाष भोसले हे सांगोला तालुक्यातील एक प्रगतिशील शेतकरी असल्याचं सांगण्यात येतंय. तसेच ते एक व्यापारी देखील असल्याचं बोललं जातंय. मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या वेळी सुभाष भोसले यांनी मनोज जरांगे यांना डिफेंडर कार भेट म्हणून दिली. सुभाष भोसले यांनी ही कार 1 कोटी 90 लाख रुपयांना घेतली. यासाठी सुभाष भोसले यांनी दीड कोटी चे लोन घेतलं असल्याची देखील माहिती समोर येतेय. सुभाष भोसले यांचे कुटुंबीय सोन्या-चांदीचा व्यापार करतात. मनोज जरांगे यांच्यावर होत असलेल्या सततच्या आरोपानंतर जरांगे यांचे समर्थक आक्रमक झाले असून येथून पुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा जरांगे समर्थक गंगाधर काळकुटे यांनी दिला आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी जरांगे यांच्या सहकार्याचे चौदाशे कोटी रुपयांचे कंत्राट रद्द झाल्यामुळे आंदोलन केले असल्याचा आरोप केला आहे. वडेट्टीवारांच्या आरोपानंतर मंत्री उदय सावंत यांनी देखील पुरावे असेल तर समोर आणावे असे आव्हान केले होते यावर ज्यांना पुरावे पाहिजे असेल त्यांना मी देतो असे म्हणत चौदाशे कोटी रुपयांच्या कंत्राटाबद्दल खळबळ जनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलन पाठीमागे घेण्यावरून राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे.
मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनात आता कंत्राटे, महागड्या आलिशान गाड्या तसेच आर्थिक व्यवहार आल्याने नव्या वादाला तोंड फुटत आहे. मनोज जरांगे हे मराठा आंदोलनाचे नेतृत्व करत असले तरी सत्यता ही आहे की मनोज जरांगे स्वतः एक अशिक्षित व्यक्ती आहे. काही निर्णय घेण्यात त्यांचा अभ्यास कमी पडत आहे. त्यामुळे चर्चेसाठी सरकारची मोठी गोची होत आहे, काही गोष्टी त्यांना समजून सांगताना त्यांचा अशिक्षितपणा चर्चेसाठी आडवा आलेला आहे. परंतु संवेदनशील असलेले हे आंदोलन शासनाला शिव्या खात मान्य करण्याची वेळ येत आहे. समाजाला पुढे करत मनोज जरांगे हे अनेक ज्येष्ठ व्यक्तींना तसेच पक्षीय नेत्यांना शिवराळ भाषा वापरत आहे. हे देखील मनोज जरांगे यांचं अज्ञान उघड पाडणारे ठरले आहे. मराठा आरक्षण मागण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांनी पुढे आले पाहिजे जेणेकरून मराठा आरक्षणाचे मुद्दे त्यांना समजून सांगता येईल व कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण देता येईल.
मनोज जरांगे यांची जी भूमिका आहे ही सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिलेली आहे. अडाणी अशिक्षित असलेले मनोज जरांगे फक्त समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढत आहे. त्यातच त्यांच्यावर होणारे आरोप अतिशय भयंकर आहेत कधी काळी त्यांची सहकारी राहिलेले बावस्कर यांनीच त्यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. तसेच ईडीकडे त्यांनी मनोज जरांगे यांच्या बाबत तक्रार केलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला आता वेगळं मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळावं हे भाजप सरकारचं मत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर सरकार पेक्षा जास्त मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आहे. तरीही मनोज जरांगे हे कुणाच्या तरी सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवत आहे. यावेळी मनोज जरांगे यांच्यावर शरद पवार यांचे बाहुले असल्याचा देखील आरोप होत आहे. परंतु हे सर्व आरोप मनोज जरांगे फेटाळून लावत आहेत.
मनोज जरांगे यांच्यावर होणारे आरोप हे अतिशय गंभीर आहे. मराठा आरक्षणासाठी हे कृत्य घातक आहे. मनोज जरांगे यांच्यावर आंदोलनात ठेकेदार सहभागी असल्याचा देखील आरोप झालेला आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेला समाज आहे. मराठा समाजात अनेक उच्च शिक्षित तरुण त्याचबरोबर सनदी अधिकारी देखील आहेत. माजी सनदी अधिकाऱ्यांच्या सहभागातून हे आरक्षण यशस्वी होऊ शकते. माजी सनदी अधिकारी किंवा उच्च श्रेणीतील अधिकारी यांनी समोर आले पाहिजे. परंतु मनोज जरांगे हे कुठल्याही ज्येष्ठ नेत्याचं किंवा ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाचं ऐकून घेत नाहीत “हम करोसे, वो कायदा!” या उक्तीप्रमाणे ते आपला कारभार चालू पहात आहे. भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. येथे संविधानानुसार देश चालतो, कायदाव्यवस्था चालते हेच मुळात मनोज जरांगे विसरत आहेत.







